पाहा, सोनिया - राजीव गांधींचा लग्नाचा व्हिडिओ

गुलाबी रंगाच्या साडीत साध्याच पद्धतीनं नटलेली वधू आणि क्रिम रंगाच्या शेरवानीत राजबिंडा वर... हे दृश्यं होतं राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या लग्नातलं... 

Updated: Oct 7, 2015, 01:13 PM IST
पाहा, सोनिया - राजीव गांधींचा लग्नाचा व्हिडिओ title=

मुंबई : गुलाबी रंगाच्या साडीत साध्याच पद्धतीनं नटलेली वधू आणि क्रिम रंगाच्या शेरवानीत राजबिंडा वर... हे दृश्यं होतं राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या लग्नातलं... 

२५ फेब्रुवारी १९६८ रोजी २३ वर्षांचे राजीव आणि २१ वर्षांची सोनिया यांनी एका खाजगी सोहळ्यात लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. आत्तापर्यंत अनेकदा त्यांच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतील. पण, पहिल्यांदाच राजीव-सोनिया विवाहाचा व्हिडिओही समोर आलाय. 

या विवाहाच्या वेळी इंदिरा गांधी आणि विजया लक्ष्मी पंडीत यांनी यजमानपद भूषविलं... त्याही या व्हिडिओत दिसत आहेत. तसंच संजय गांधी आणि भारताचे तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन हेदेखील या व्हिडिओत दिसतायत.  

या लग्न सफदरजंग रोडवरच्या एका लॉनवर तर मेहंदीचा कार्यक्रम बच्चन यांच्या घरी पार पडला होता. 

व्हिडिओ पाहा... या व्हिडिओमध्ये आवाज नाही...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.