निवडणुका कधीही, तयार रहा - सोनिया गांधी

Last Updated: Tuesday, March 19, 2013 - 13:06

www.24taas.com, नवी दिल्ली
कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयार रहावं अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलीये. काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत त्यांनी हे सूचक वक्तव्य केलंय. सोनियांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकींची चर्चा रंगात येण्याची शक्यता आहे...
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पार्टी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. २०१४ मध्ये, लोकसभा निवडणूक होणार असली तरी सुद्धा सध्याची राजकीय परिस्थीती मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसून तयार राहण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी दिले आहेत.
काँग्रेसच्या संसदील दलाच्या झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच करावी असे सांगितले. सोनिया गांधींनी सीपीपीच्या बैठकीत सांगितले की, आम्ही श्रीलंकेच्या नागरिकांच्या मानवाधिकाराचे मजबूतीने समर्थन करीत आहोत. श्रीलंकेतील तमिळींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

First Published: Tuesday, March 19, 2013 - 13:05
comments powered by Disqus