खुशखबर... साखर झाली स्वस्त!

मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याचा परिणाम आज साखरेच्या किंमतीवर पाहायला मिळाला.

Updated: May 5, 2015, 08:46 PM IST
खुशखबर... साखर झाली स्वस्त! title=

नवी दिल्ली : मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याचा परिणाम आज साखरेच्या किंमतीवर पाहायला मिळाला. साखरेच्या किंमती पडल्यचानं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय. 

घाऊक ग्राहकांकडून मागणीत घट झाल्यामुळे मात्र पुरवठा स्थिर राहिल्यानं साखरेचा मोठा स्टॉक जमा झालाय. त्यानंतर, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज साखरेच्या किंमतीत ४० रुपये प्रति क्विंटल घट झालीय. 

बाजार सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मवाना, किन्नौनी, मोदीनगर, खतौली, अनूपशहर तसंच चांदपूरच्या किंमतीतही २०-२० रुपयांची घट दिसून आली. त्यानुळे, याची किंमत सध्या अनुक्रमे, २६१० रुपये, २७०० रुपये, २५८० रुपये, २६८० रुपये, २५६० रुपये आणि २५७० रुपये प्रति क्विंटल

तर किरकोळ बाजारात साखरेची किंमत ३० ते ३४ रुपये प्रति किलो होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.