पनामा पेपर्स प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारकडे मागितले सर्व रिपोर्ट

विदेशी बँकांमध्ये जमा भारतीयांच्या पैशांची माहिती पनामा लीक प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत की, चौकशी समितीने बनवलेले ६ रिपोर्ट बंद पाकिटामध्ये सुप्रीम कोर्टात जमा करावे.

Updated: Mar 7, 2017, 03:09 PM IST
पनामा पेपर्स प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारकडे मागितले सर्व रिपोर्ट title=

नवी दिल्ली : विदेशी बँकांमध्ये जमा भारतीयांच्या पैशांची माहिती पनामा लीक प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत की, चौकशी समितीने बनवलेले ६ रिपोर्ट बंद पाकिटामध्ये सुप्रीम कोर्टात जमा करावे.

सुप्रीम कोर्टाने सरकारला आदेश दिले आहेत की, हे रिपोर्ट ४ आठवड्यांमध्ये जमा करावे. कोर्टाने म्हटलं की, आम्ही बघू आणि मग निर्णय घेऊ की या प्रकरणात एसआयटी नेमायची की नाही. पुढील सुनवाई १८ एप्रिलला होणार आहे.