महिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

एका महिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे.

Updated: Jul 25, 2016, 04:08 PM IST
महिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टाची मंजुरी title=

नवी दिल्ली : एका महिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे. मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या तपासणी अहवालानंतर ही परवानगी देण्यात आली. गर्भाची मानसिक वाढ योग्य होत नसल्याचं तपासणीमध्ये निदर्शनास आलं. 

यापूर्वी 20 आठवड्यांपर्यंतच गर्भपाताला मंजुरी होती. त्यामुळे या महिलेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तिची याचिका मंजूर करत कोर्टानं 24 आठवडे झाल्यानंतरही गर्भपाताला परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली ही महिला बलात्कार पीडित आहे.