गोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली

दहीहंडीत 12 वर्षाच्यावरचे बालगोविंदा सहभागी होऊ शकणार आहे. तसेच 20 फुटांच्या मर्यादेलाही सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे,

Updated: Aug 14, 2014, 12:43 PM IST
गोविंदा आला रे...! उंचीची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली

नवी दिल्ली : दहीहंडीत 12 वर्षाच्यावरचे बालगोविंदा सहभागी होऊ शकणार आहे. तसेच 20 फुटांच्या मर्यादेलाही सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे, यामुळे तूर्तास तरी उंचीची मर्यादा राहिलेली नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीत 18 वर्षाखालील मुलांना सहभागावर मनाई केली होती, तसेच दहीहंडीच्या मनोऱ्याची उंची 20 फूट असावी अशी मर्यादा घालून दिली होती, मात्र सुरक्षेविषयक उपाय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत. तसेच सुरक्षेची काळजी आणि जबाबदारी ही आयोजकांनी घ्यावी असंही सुप्रीम कोर्टानं बजावलं आहे.

यावर आता पुढची सुनावणी होणार आहे, राज्य सरकार यावर आपलं मत मांडणार आहे. मात्र यावर्षाची दहीहंडी गोविंदांना परंपरेप्रमाणेच साजरी करता येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.