मुस्लिम तरुणांना विनापुरावा ताब्यात घेऊ नका- शिंदे

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, October 1, 2013 - 08:37

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अल्पसंख्यक समाजाच्या लोकांना विनाकारण ताब्यात घेतलं जाऊ नये, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेत. त्यांनी यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय.
आपल्याला विनाकारण टार्गेट गेलं जात असल्याची अल्पसंख्यक समाजातल्या काही तरुणांची भावना झाली आहे. त्यामुळे दहशतवादविरोधी कारवाईच्या नावाखाली पुराव्याशिवाय मुस्लिमांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेऊ नये, असं शिंदे यांनी या पत्रात म्हटलंय. कुठल्याही निरपराध तरुणाची विनाकारण छळवणुक होऊ नये असं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सुशिलकुमार शिंदेंनी लिहिलं आहे.
समाजातील बंधुभाव आणि धार्मिक सहिष्णुता टिकवून ठेवण्यासाठी केंद्रिय गृहमंत्र्यांनी हे पत्र लिहिलं आहे. “चुकीने अटक केल्यास त्या अल्पसंख्यांक व्यक्तीला तात्काळ सोडण्यात यावं, पण त्याचबरोबर त्याला या चुकीचा योग्य मोबदला देण्यात यावा, तसंच त्याचं पुनर्वसन करण्यात यावं.” असं केंद्रिय गृहमंत्र्यांनी पत्रात लिहिलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 30, 2013 - 16:37
comments powered by Disqus