सुशीलकुमार शिंदेंचं बाळासाहेबांना आव्हान

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाकिस्तानी खेळाडूंना खेळू न देण्याच्या आव्हानाला केंद्र सरकारनं प्रतिआव्हान दिलयं.

Updated: Nov 8, 2012, 05:03 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाकिस्तानी खेळाडूंना खेळू न देण्याच्या आव्हानाला केंद्र सरकारनं प्रतिआव्हान दिलयं. भारतात क्रिकेट सामने होतीलच अशी ठाम भूमिका केंद्रीय़ गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी घेतलीये.
शिवसेनेच्या धमकीने कोणताही फरक पडणार नाही असंही शिंदे यांनी सांगितलंय. काही लोक क्रिकेटचा संबध २६/११ शी जोडतात. मात्र हे चुकीचं असल्याचा टोलाही शिंदेंनी शिवसेनेला लगावलाय. भारतात होणारे पाकिस्तानचे सामने उधळून लावा असं आवाहन शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला केलंय.
तसंच शिवसैनिकांनाही त्यांनी याबाबत आदेश दिलाय. त्यामुळं भारत-पाक क्रिकेट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर या पुढच्या काळातही केंद्र सरकार आणि बाळासाहेबांमध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता आहे.