फोनवर कुणालाही शिव्या देण्याआधी हे वाचा...

उत्तर प्रदेशमध्ये बरेली झोनमध्ये येणाऱ्या नऊ जिल्ह्यांमधील पोलीस नियंत्रण कक्षाच्या 100 नंबरवर फोन करून शिव्या आणि अश्लील कॉल करणाऱ्या ग्राहकांना आता फटका बसणार आहे. त्यांचं सिम कार्ड बंद करण्याची कारवाई होईल. 

Updated: Jul 1, 2014, 11:30 AM IST
फोनवर कुणालाही शिव्या देण्याआधी हे वाचा... title=
प्रातिनिधिक फोटो

बरेली: उत्तर प्रदेशमध्ये बरेली झोनमध्ये येणाऱ्या नऊ जिल्ह्यांमधील पोलीस नियंत्रण कक्षाच्या 100 नंबरवर फोन करून शिव्या आणि अश्लील कॉल करणाऱ्या ग्राहकांना आता फटका बसणार आहे. त्यांचं सिम कार्ड बंद करण्याची कारवाई होईल. 

बरेली झोनचे पोलीस महानिरीक्षक जॅकी अहमदनं आज सांगितलं की, झोन अंतर्गत येणारे पिलीभीत, बरेली, बदायूं, संबळ, शाहजहांपूर, मुरादाबाद, अमरोहा, बिजनौर आणि रामपूर जिल्ह्यातील पोलिसांना सर्वात अगोदर शिव्या आणि अश्लील बोलणारे फोन आल्यास त्यांचा नंबर आणि वेळ रजिस्टर करावं लागणार. तसंच कॉल रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 

संबंधित प्रभारी रेडिओ अधिकाऱ्याकडून असे फोन आल्यास त्याबद्दलचा रिपोर्ट वरिष्ठ पोलीस अधिकक्षांना आणि पोलीस अधिकांचा द्यायचाय. हे अधिकारी फोन कॉलचा तपास करून त्यांची सेवा बंद करण्यासाठी संबंधित कंपनीला पत्र देतील. नंतर कंपनीद्वारे त्या फोनची सेवा बंद करण्यात येईल. 

फोन सेवा बंद झालेले ग्राहक आपलं म्हणणं पोलिसांसमोर मांडू शकतात. जर त्यांचं उत्तर समाधानकारक असेल तर पोलीस त्यांच्या फोनची सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश देवू शकतात. 100 नंबरवर फोन करून अनेक लोक अश्लील वक्तव्य करत असतात आणि शिव्याही देतात, म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.