ताजमहाल परिसरात कोळसा, शेण जाळण्यास मनाई

जगातल्या अप्रतिम वास्तूंपैकी एक अशी ओळख असलेल्या आग्रा इथल्या ताजमहाल परिसरात, गाईचं शेण आणि कोळसा जाळण्याला मनाई करण्यात आलीय.

Updated: Jan 13, 2015, 02:56 PM IST
ताजमहाल परिसरात कोळसा, शेण जाळण्यास मनाई  title=

आग्रा : जगातल्या अप्रतिम वास्तूंपैकी एक अशी ओळख असलेल्या आग्रा इथल्या ताजमहाल परिसरात, गाईचं शेण आणि कोळसा जाळण्याला मनाई करण्यात आलीय.

पांढऱ्या संगमरवरी दगडात साकारलेल्या ताजमहालच्या सौंदर्याला, कोळसा तसंच गाईच्या शेणाच्या धुरामुळे बाधा येतेय. एका अमेरिकी प्रकाशनानं याबाबतचं वृत्त छापलं. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.

आजही आग्रा परसिरात गाईच्या शेणाच्या गोवऱ्या चुलीसाठी वापरल्या जात आहेत. तर स्थानिक लघु उद्योजकही बांगड्या तसंच मिठाई तयार करण्यासाठी कोळशाचा वापर करत आहेत. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.