दिल्लीत हाय अलर्ट जारी

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, August 10, 2013 - 08:18

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

जमात उद दवा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख आणि २६-११च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदनं लाल किल्ल्यावर हल्ल्याची धमकी दिलीये. त्यामुळे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
हाफीजच्या कराचीमधल्या भाषणाची सीडी गुप्तहेरांच्या हाती लागलीये. या भाषणात त्यानं लाल किल्ल्यावर हल्ल्याचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

१५ ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात. त्यामुळे या भागाची सुरक्षा अमुलाग्र वाढवण्यात आलीये. तर दिल्लीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 10, 2013 - 08:18
comments powered by Disqus