मंत्रिमंडळातील फेरबदल मंजुरीसाठी प्रणवदांकडे...

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अखेर फेरबदल करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्रिपदी चिदम्बरम यांची वर्णी लागणार आहे तर गृहमंत्रिपदावर सध्याचे ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे विराजमान होणार असल्याचं आता नक्की झालंय. मंत्रिमंडळातील बदल मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे धाडण्यात आल्याची, माहिती सूत्रांकडून मिळतेय. विरप्पा मोईलींकडे ऊर्जा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला जाणार आहे.

Updated: Jul 31, 2012, 05:58 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अखेर फेरबदल करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्रिपदी चिदम्बरम यांची वर्णी लागणार आहे तर गृहमंत्रिपदावर सध्याचे ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे विराजमान होणार असल्याचं आता निश्चित झालंय. मंत्रिमंडळातील बदल मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे धाडण्यात आल्याची, माहिती सूत्रांकडून मिळतेय. विरप्पा मोईलींकडे ऊर्जा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला जाणार आहे.

 

मंत्रिमंडळातील फेरबदल राष्ट्रपती भवानात मंजुरीसाठी धाडण्यात आलंय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या बदलांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर ताबडतोब याबद्दल औपचारिक घोषणाही करण्यात येणार आहे. प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार हे नक्की झालं होतं. प्रणव मुखर्जींच्या अर्थमंत्रालयाच्या राजीनाम्यानंतर ही खूर्ची खाली आहे. सध्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या खात्याची सूत्रं हातात घेतलेली आहेत. पी. चिदंबरम यांनी याआधीही अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळलेली आहे. 2008 सालापर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती पण 26/11 च्या हल्ल्यानंतर त्यांना गृह मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.

 

कॅबिनेटमधल्या फेरबदलानंतर पुन्हा शपथग्रहणाची आवश्यकता नसेल कारण यातील सर्वच जण कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून कारभार सांभाळत आहेत. मात्र, मान्सून सत्रानंतर पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात कॅबिनेटमध्ये फेरबदलाचे संकेत मिळालेत. केंद्रीय गृहमंत्री पदावर कार्यरत झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेत यूपीएचा नेता म्हणून बहुमान मिळू शकतो.

 

.