मायावतींच्या चौपट अखिलेश यादवचा पार्क

मायावतींना बनवलेल्या पार्कमधील मोकळ्या जागेत हॉस्पिटल बनवण्याचं अश्वासन देणारे समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता समाजवादी पार्टीचे नेते जनेश्वर मिश्रा यांच्या नावाने पार्क बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Aug 8, 2012, 05:12 AM IST

www.24taas.com, लखनौ

 

मायावतींना बनवलेल्या पार्कमधील मोकळ्या जागेत हॉस्पिटल बनवण्याचं अश्वासन देणारे समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता समाजवादी पार्टीचे नेते जनेश्वर मिश्रा यांच्या नावाने पार्क बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे या पार्कची आधारशीला बसवण्यात आली.

 

अखिलेश यादव यांच्या या निर्णयावर बसपाने नाराजी व्यक्त केली आहे. यादव यांच्या निर्णयाचा विरोधही बसपाने केला आहे. ३६७ एकर जागेमध्ये हा पार्क बनवण्यात येणार आहे. हा पार्क मायावती यांच्या पार्कपेक्षा चौपट मोठा असेल. म्हणजेच मायावतींनी आपल्या कारकीर्दीत बनवलेले सर्व पार्क या पार्कपुढे खुजे ठरतील.

 

३६७ एकर एवढा विस्तार असलेल्या समाजवादी पार्कमध्ये ९०% हिरवळ असेल. सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक या सर्व सुविधा या पार्कमध्ये असतील. मात्र या पार्कमध्ये हॉस्पिटलचा पत्ता नसेल. मायावती यांनी बनवलेल्या पार्कमध्ये ९८ एकरमध्ये आंबेडकर स्मारक, ८० एकरमध्ये आंबेडकर गोमती विहार आणि २२८ एकर जागेत काशीराम स्मारक आणि इको पार्क बांधला होता. नॉयडा दलित प्रेरणा स्थल ८८ एकरमध्ये तर बादलपूर बुद्ध पार्क ३५ एकर जागेत बांधला होता.

 

अखिलेश यादव बनवत असलेला पार्क हा त्यांचे वडिल आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टसाठी किती खर्च होणार आहे, याबद्दल अद्याप कुठलीही माहिती दिली जात नसली, तरी या पार्कसाठी प्रचंड खर्च होणार आहे, यात शंकाच नाही.