नववीतल्या विद्यार्थ्याने शिक्षिकेला भोसकून मारले

नववीतल्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला भोसकून ठार मारल्याची धक्कादायक घटना चेन्नई येथील एका शाळेत घडली. धडा शिकवत असतानाच विद्यार्थ्याने शिक्षिकेला भोसकलं.

Updated: Feb 9, 2012, 05:00 PM IST

www.24taas.com, चेन्नई

 

नववीतल्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला भोसकून ठार मारल्याची धक्कादायक घटना चेन्नई येथील एका शाळेत घडली. धडा शिकवत असतानाच विद्यार्थ्याने शिक्षिकेला भोसकलं. शिक्षिकेला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

 

या दुर्दैवी घटनेची कबुली शाळा व्यवस्थापनानेही दिली. ३९ वर्षीय शिक्षिकेला विद्यार्थ्याने मरेपर्यंत भोसकून मारल्याची घटना सकाळी १०.३० च्या सुमारास वर्गात घडली. असं सांगण्यात येत आहे शिक्षिका या विद्यार्थ्याला शिस्तपालन शिकवत असताना ही घटना घडली.

 

काहीजणांनी अशी माहिती दिली की गेल्या काही दिवसांपूर्वी शिक्षिकेने या विद्यार्थ्याच्या अयोग्य वर्तनाची तक्रार विद्यार्थ्याच्या पालकांकडे केली होती. या गोष्टीचा राग मनात असल्यामुळेच विद्यार्थ्याने शिक्षिकेस भोसकले. विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली असली तरी हत्येचा निश्चित हेतू अजून स्पष्ट झालेला नाही.