गुजरातमध्ये शेतकऱ्यांना पोलिसांनी झोडपले

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्मामुळे वातावरण तप्त झाले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Updated: Feb 24, 2012, 11:40 AM IST

www.24taas.com, अहमदाबाद

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्मामुळे वातावरण तप्त झाले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

गांधीनगर येथे पाचशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून  मोदी सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. विधानभवनाजवळ पोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी शेतकऱ्यांसोबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोदवाडिया आणि ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेलाही होते. शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. राज्यात उद्योगांच्या तुलनेत मोदी सरकारचे शेतीकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या वेळी केला.

दरम्यान, गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. विधानसभेत कॉंग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते. पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून कॉंग्रेस सदस्यांनी विधानसभेत सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. याची दखल राज्यपाल कमला बेनिवाल यांनीही घेतली. आपल्या अभिभाषणात त्यांनी या मुद्द्याचा समावेश केला.