आंध्र प्रदेशची शेतकऱ्यांसाठी पथदर्शी कर्ज योजना

आंध्र प्रदेशने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध करुन दिलं आहे. पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देणारे आंध्र देशातले पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेशातील ९५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Updated: Nov 19, 2011, 04:16 PM IST

झी २४ तास वेब टीम

महाराष्ट्रात आधी उसाला आणि आता कापसाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची पाळी ओढावली असताना शेजारच्या आंध्रने मात्र नवा पायंडा पाडला आहे. आंध्र प्रदेशने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध करुन दिलं आहे. पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देणारे आंध्र देशातले पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेशातील ९५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी ही योजना २ ऑक्टोबर रोजी जाहीर केली होती. आंध्र प्रदेश सरकारला योजनेच्या अनुदानापोटी एक हजार कोटी रुपयांचा भार सोसावा लागणार आहे. ही योजना एक लाख रुपया पर्यंतच्या कर्जासाठी लागू होणार आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी लवचिक ठेवण्यात आला आहे आणि त्याचा कालावधी एक वर्षा पर्यंत आहे.