किरण बेदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

'टीम अण्णां'मधील सदस्य किरण बेदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवी दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.

Updated: Nov 27, 2011, 06:14 AM IST
झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली
'टीम अण्णां'मधील सदस्य किरण बेदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.   दिल्लीन्यायालयाच्या आदेशानंतर नवी दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.

दिल्ली पोलिसांनी किरण बेदींविरोधात फसवणूक आणि धोकेबाजीचा गुन्हा दाखल केलाय.  'इंडिया व्हिजन  फाऊंडेशन' या ट्रस्टच्या माध्यमांतून बेदी यांनी 'मेरी पोलीस' या मोफत कम्प्युटर प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत अनेक निमलष्करी दले आणि राज्य पोलिस संघटनांची फसवणूक केल्याची तक्रार दिल्लीतील वकील देविदर सिंह चौहान यांनी केली होती.

 

BSF, CISF,ITBP, CRPF आणि अन्य राज्य पोलीस यंत्रणांतील जवानांच्या कुटुंबियांना आणि मुलांना मोफत कम्प्युटर प्रशिक्षण देण्यासाठी बेदी यांना मायक्रोसॉफ्टकडून 50 लाखांकडून अधिक देणगी मिळाली होती. मात्र त्यांनी मोफत कम्प्युटर प्रशिक्षण किंवा मोफत कम्प्युटर वाटप केलेच नाहीत.

 

प्रशिक्षण केंद्रासाठी जमीन आणि वीज या सुविधा पोलिस यंत्रणांकडूनच बेदी यांना पुरवण्यात आल्या होत्या. मात्र बेदी यांनी खरेदी आणि विजेवरील खोटाच खर्च दाखवला, अशी तक्रार आहे.