... हे आहे जगातलं सगळ्यात मोठ्ठं जहाज

'पिएटर स्केल्ट' हे आत्तापर्यंतचं जगातलं सर्वात मोठं जहाज ठरलंय. हे जहाज बुधवारी दक्षिण कोरियातून निघालंय.... १ डिसेंबर रोजी ते  हॉलंडच्या रॉटरडम बंदरामध्ये दाखल होईल. इथं या जहाजाचं काम पूर्ण करण्यात येईल.

Updated: Nov 22, 2014, 09:29 PM IST
... हे आहे जगातलं सगळ्यात मोठ्ठं जहाज title=

दक्षिण कोरिया : 'पिएटर स्केल्ट' हे आत्तापर्यंतचं जगातलं सर्वात मोठं जहाज ठरलंय. हे जहाज बुधवारी दक्षिण कोरियातून निघालंय.... १ डिसेंबर रोजी ते  हॉलंडच्या रॉटरडम बंदरामध्ये दाखल होईल. इथं या जहाजाचं काम पूर्ण करण्यात येईल.

१२४ मीटर रूंद आणि ३८२ मीटर लांबीचं हे जहाज जे समुद्रातील मोठमोठे तेलाचे रिग्स काढण्यास सक्षम आहे.  हे जहाज समुद्रातील तेलाचे मोठ मोठे रिग्स काढण्यासाठी तयार करण्यात आलंय. हे जहाज बनविण्यासाठी जवळपास 3 अरब डॉलरचा खर्च आल्याचं सांगण्यात येतंय.

'आलसीज' ही स्वीस कंपनी हे जहाज बनविणार आहे. ही कंपनी समुद्रात पाईप पसरवण्यासाठी आणि समुद्रातील इतर निर्मिती धंद्यासाठी ओळखली जाते.

रॉटरडम बंदरासोबत पार्टनरशिप बनविल्या जाणाऱ्या या जहाजाचे स्थान हे बंदरावरच खास तयार करण्यात आलेल्या जागेवर असणार आहे. डिसेंबर मध्ये सर्वाँचेच लक्ष या जहाजाकडे असेल यात शंकाच नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.