लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मित्रांच्या हवाली केली पत्नी!

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, May 24, 2013 - 13:39

www.24taas.com, झी मीडिया, मुरादाबाद
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मित्रांच्या हवाली पत्नीला देण्याची एक धक्कादायक घटना मुरादाबाद येथे घडली आहे. तब्बल एक महिना हा घाणेरडा प्रकार सहन केल्यानंतर महिलेने पतीच्या विरोधात कौटुंबिक कलह अंतर्गत तक्रार दाखल केली.
या संदर्भात पोलिसांनी पतीला चौकशीसाठी अनेक वेळा बोलवून सुद्धा पती चौकशीसाठी उपस्थित राहिला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडित युवती मुरादाबाद येथील रहिवासी आहे. तिचे लग्न संभळ जिल्ह्यातील एका युवकाशी झाले. हा युवक गाझियाबाद येथ काम करत होता आणि त्याच ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होता.
पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हनीमूनला जातो सांगून पत्नीला गाझियाबाद येथे घेऊन आला. त्याच दिवशी पतीचे चार मित्र त्याच्या घरी आले. सर्वांनी दारू प्यायली आणि नंतर युवकाने आपल्या पत्नीला त्या मित्रांच्या हवाली केले. अशा प्रकारे तब्बल एक महिना ते मित्र त्या महिलेशी दुष्कर्म करत होते. पत्नीने विरोध केल्यावर पती तिला मारहाण करत असे, महिलेला घरी संपर्क करण्याचे कोणतेच साधन नव्हते.
हा प्रकार कोणाला सांगितला, तर तुझे आयुष्य खराब करेल, अशी धमकी पती देत असे. एक महिन्यानंतर माहेरून कुटुंबिय आले आणि त्या महिलेवरील अत्याचार संपले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 24, 2013 - 13:37
comments powered by Disqus