कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला हिरवा कंदील

तामिळनाडूतल्या कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला सुप्रीम कोर्टानं परवनागी दिलीये. कुडणकुलम प्रकल्प सुरक्षित असून अशा प्रकारचा प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे, देशाची वर्तमान आणि भविष्यातील ऊर्जा गरज भागवण्यासाठी हा प्रकल्प महत्तवाचा असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 6, 2013, 01:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
तामिळनाडूतल्या कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला सुप्रीम कोर्टानं परवनागी दिलीये. कुडणकुलम प्रकल्प सुरक्षित असून अशा प्रकारचा प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे, देशाची वर्तमान आणि भविष्यातील ऊर्जा गरज भागवण्यासाठी हा प्रकल्प महत्तवाचा असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय. त्याचबरोबर या प्रकल्पाला विरोध करणा-या कार्यकर्त्यांवरील गुन्हेगारी खटले रद्द करण्याचे आदेशही यावेळी सुप्रीम कोर्टानं दिलेत.
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविताना प्रकल्पाच्या विरोधातील याचिका फेटाळून लावत हा प्रकल्प सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने पीपल्स मूव्हमेंट अगेन्स्ट न्यूक्लिेअर एनर्जीने (पीएमएएलई) या प्रकल्पाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली होती. आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश दिले.

आता या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे पार झाले असून, लवकरच प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. कुडनकुलम प्रकल्प हा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व्यापक विचार करता आणि भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा असल्याचे, न्यायालयाने म्हटले आहे.

जपानमधील फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाच्या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी कुडलकुलमच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. स्थानिकांच्या आंदोलनामुळे प्रकल्पाच्या उभारणीलाच खो बसला होता. पण, आता हे सर्व अडथळे पार झाले आहेत. यापूर्वी या प्रकल्पासाठी स्थानिक धरणांतून पाणी वापरण्याचा प्रस्ताव होता. पण, आता प्रकल्पासाठी समुद्रातील पाण्याचा वापर करण्यात येणार आहे.