केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर : तृणमुलचा आरोप

केंद्र सरकारकडून गैरवापर करण्यात येत असल्याची, टीका तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी केली आहे.  शारदा गैरव्यवहार प्रकरणात पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्रा यांना अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी संसदेबाहेर तृणमुलच्या खासदारांनी निदर्शने केली. 

Updated: Dec 15, 2014, 11:47 PM IST
केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर : तृणमुलचा आरोप title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून गैरवापर करण्यात येत असल्याची, टीका तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी केली आहे.  शारदा गैरव्यवहार प्रकरणात पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्रा यांना अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी संसदेबाहेर तृणमुलच्या खासदारांनी निदर्शने केली. 

तृणमुलचे खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले, की भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सीबीआयला पत्र लिहून तृणमुल खासदाराविरोधात कारवाई करण्यास सांगितले. राजकीय हेतूसाठी सीबीआयचा केंद्राकडून गैरवापर करण्यात येत आहे. 

तृणमुलच्या खासदारांनी आज संसदेबाहेर काळी शाल अंगावर घेत सरकारविरोधात निदर्शने केली. या अटकेमागे कोणतेही राजकारण नसल्याचं,  तृणमुलच्या या आरोपांना उत्तर देताना भाजपने म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.