अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी...

बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.

Updated: Dec 26, 2013, 03:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.
पश्चिाम चंपारण्य जिल्ह्यातील सोमगड पंचायतीने मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत हा धक्कादायक निर्णय घेतलाय. या पंचायतीचा आदेशानुसार एखाद्या मुलगी कायदा भंग करत मोबाईल वापरताना दिसली तर तिच्या कुटुंबीयांकडून मोठी रक्कम दंड स्वरुपात आकारण्यात येईल, असा इशाराच पंचायतीने गावातील लोकांना दिलाय. अशी माहिती, सोमगड गावातील पंचायतीच्या महिला सरपंचाचे पतीनं – जाकीर अन्सारी यांनी दिलीय. महिला सरपंच अन्सारी यांनी हा निर्णय सर्व गावकर्यांहच्या मदतीने घेतल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. तसंच या आदेशाचे गावातील लोक उल्लंघन करणार नाही असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केलाय. गावातील सर्व लोक हा फतवा पाळण्याची काळजी घेतील, असं त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, यावर तरुण मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा अधिकार पंचायतीला नाही, असं बिहारचे पंचायतराज मंत्री भीमसिंह यांनी म्हटलंय. पंचायतीच्या विरोधात कोणत्याही व्यक्तीनं तक्रार केल्यास पंचायतीविरुद्ध सरकारी कारवाई करण्यात येईल, असंही भीमसिंह यांनी स्पष्ट केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.