उत्तराखंडमधील पराभव भाजपने केला मान्य

उत्तराखंड विधानसभेत मोठ्या नाट्यमयरीत्या विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेचं चित्रिकरण करण्यात आलंय. याचा निकाल उद्या लागणार असला तरी भाजपने आपला पराभव मान्य केल्याचे दिसून येत आहे.

Updated: May 10, 2016, 09:41 PM IST
उत्तराखंडमधील पराभव भाजपने केला मान्य title=

डेहराढून : उत्तराखंड विधानसभेत मोठ्या नाट्यमयरीत्या विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेचं चित्रिकरण करण्यात आलंय. याचा निकाल उद्या लागणार असला तरी भाजपने आपला पराभव मान्य केल्याचे दिसून येत आहे.

विश्वासदर्शक ठरावचा संपूर्ण अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करण्यात येणार असून उद्या निकाल जाहीर करण्यात येईल. त्यामुळं कोण हारलं आणि कोण जिंकलं हे उद्याच स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी बहुजन समाज पार्टीच्या दोन आमदारांनी पाठिंबा दर्शवल्यामुळं काँग्रेसचा बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याची चर्चा आहे. 

काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हरिश रावत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला तरी उद्या अनिश्चितता संपणार असल्याचं सूचक विधान त्यांनी केलं. तर भाजपचे नेते गणेश जोशी यांनीही भाजप आकड्यांच्या खेळात मागे पडल्याचं विधान केलं. त्यामुळं काँग्रेसचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र सध्या दिसतंय.