VIDEO : अकॅडमीत तोडफोड करणाऱ्यांना खलीनं शिकवला धडा!

काही दिवसांपूर्वी एका परदेशी रेसलरनं पंजाबमधील खली अकॅडमी घुसून मोठी तोडफोड केली होती. त्याचा बदला अखेर खलीनं घेतलाय. 

Updated: Oct 13, 2016, 04:13 PM IST
VIDEO : अकॅडमीत तोडफोड करणाऱ्यांना खलीनं शिकवला धडा!   title=

चंदीगड : काही दिवसांपूर्वी एका परदेशी रेसलरनं पंजाबमधील खली अकॅडमी घुसून मोठी तोडफोड केली होती. त्याचा बदला अखेर खलीनं घेतलाय. 

प्रसिद्ध रेसलर दिलीप सिंह ऊर्फ ग्रेट खलीनं आपल्या अकॅडमीत तोडफोड करणाऱ्या आणि आपल्या विद्यार्थी, भाऊ सुरेंद्र राना यांना मारहाण करणाऱ्या रेसलर ब्रॉडी स्टीलला चांगलाच धुतलाय. 

स्टील ज्या हॉटेलमध्ये थांबलाय त्या हॉटेलमध्ये जाऊन... त्याच्या रुममध्ये घुसून...  गर्लफेंडसमोरचं खलीनं स्टीलला चांगलाच धडा शिकवलाय. 

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आलाय. यामध्ये खली स्टीलला एका रॉडनं मारहाण करताना दिसतोय. तर त्याची गर्लफेंड त्याला सोडून देण्यासाठी खलीला विनंती करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकॅडमीत तोडफोड करणाऱ्यांमध्ये स्टीलची गर्लफ्रेंडही सोबत होती.