कर्नाटकमध्ये अंदाजे ६५ टक्के मतदान!

कर्नाटकमध्ये अंदाजे ६५ टक्के मतदान झालंय. याचा फायदा भाजपला मिळणार का, असा प्रश्न आहे. गेल्या निवडणुकीतही नेमकं ६५ टक्केच मतदान झालं होतं. मात्र यंदा स्थानिक नेत्यांकडे मतदारांचा अधिक कौल असल्याचं दिसतंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 5, 2013, 10:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बेळगाव
कर्नाटकमध्ये अंदाजे ६५ टक्के मतदान झालंय. याचा फायदा भाजपला मिळणार का, असा प्रश्न आहे. गेल्या निवडणुकीतही नेमकं ६५ टक्केच मतदान झालं होतं. मात्र यंदा स्थानिक नेत्यांकडे मतदारांचा अधिक कौल असल्याचं दिसतंय.
महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बेळगावमध्येही ६५ टक्के मतदान झालंय. याचा महाराष्ट्र एकीकरण समितीला फायदा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून कर्नाटकात मतदानास सुरुवात झाली.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. जवळपास दीड लाख सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेत.. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर जादा सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय.