पाहा जदयूच्या नेत्याचा ‘डर्टी डांस’, बार बालासोबत अश्लील नृत्य

बिहारमध्ये जदयूचे आमदार श्याम बहादूर सिंहचा अश्लील डांसचा व्हिडिओ पुढे आलाय. एका बारबालासोबत ते आपल्याच विधानसभा क्षेत्रात अश्लील डांस करत होते. नुसतं नृत्य नाही, तर सर्वांसमोर धक्कादायक अश्लील कृत्यही त्यांनी केले. 

Updated: Dec 3, 2014, 01:18 PM IST
पाहा जदयूच्या नेत्याचा ‘डर्टी डांस’, बार बालासोबत अश्लील नृत्य title=

पाटना: बिहारमध्ये जदयूचे आमदार श्याम बहादूर सिंहचा अश्लील डांसचा व्हिडिओ पुढे आलाय. एका बारबालासोबत ते आपल्याच विधानसभा क्षेत्रात अश्लील डांस करत होते. नुसतं नृत्य नाही, तर सर्वांसमोर धक्कादायक अश्लील कृत्यही त्यांनी केले. 

बिहारच्या सिवान जिल्ह्यातील बहरिया गावात आयोजित कार्यक्रमात आमदाराचा हा डर्टी डांस पाहायला मिळाला. हा व्हिडिओ पाहून स्पष्ट होतंय की आमदारानं केवळ डांसच नाही तर बार बालाला अश्लील इशारेही केले आहेत. 

श्याम बहादूर सिंह असे पहिले नेते नाहीयेत जे अशाप्रकारे अश्लील डांस करतांना वादात सापडलेत. २०१२मध्ये बरहियाचे आमदार गोपलागंजमध्ये एका लग्नसमारंभात अश्लील डांस करतांना कॅमेऱ्यात कैद झाले होते. जदयूनं आमदार श्याम बहादूरला कारणे दाखवा नोटीस बजावलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.