भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, March 19, 2013 - 14:17

www.24taas.com, नवी दिल्ली
श्रीलंकेच्या मुद्द्यावरून यूपीए सरकारचा पाठिंबा डीएमकेने काढून घेतल्यानंतर भाजपने निवडणुकीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आम्ही कायम निवडणुकीसाठी तयार असतो. सरकार आता अल्पमतात आली आहे. त्यामुळे त्यांनी आता पाय उतार व्हावे, असे भाजपचे नेते मुक्तार अब्बास नकवी यांनी संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सध्या यूपीए सरकार व्हेंटिलेटरवर आहे. पण आता या किंवा त्या मार्गाने सरकारने पाठिंबा जमविला तर ते देशहीताचे नसेल, असा जोरदार हल्ला नकवी यांनी सरकारवर चढविला आहे.
संसदेत श्रीलंकेचा मुद्दा सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन सरकारने दिले आहे, यावर बोलताना नकवी म्हणाले, मुद्दा कसा सोडवायचा हा सरकारचा प्रश्न आहे. पण तो देशहिताचा नसेल हे नक्की.

First Published: Tuesday, March 19, 2013 - 14:08
comments powered by Disqus