विप्रो कंपनीतून ६०० कर्मचाऱ्यांना काढलं

देशातील सर्वात मोठी सॉफटवेअर कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक मुल्यांकनानंतर अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.

Intern - | Updated: Apr 21, 2017, 12:51 PM IST
विप्रो कंपनीतून ६०० कर्मचाऱ्यांना काढलं

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सॉफटवेअर कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक मुल्यांकनानंतर अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विप्रो कंपनीने ६०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर २,००० कर्मचाऱ्यांना काढल्याची चर्चाही दुसरीकडे आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या १.७६ लाखहून अधिक होती.

विप्रो कंपनीने म्हटलं आहे की, 'वर्षभर या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मुल्यांकन केले जाते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामासोबत कंपनीची धोरणे आणि ग्राहकांची मागणी या गोष्टींचाही विचार केला जातो. या मुल्यांकनानंतर काही कर्मचाऱ्यांना नोकरी सोडावी लागते. त्यांची संख्या दरवर्षी बदलत असते.'