अनोखा रेकॉर्ड : महिलेनं एकाच वेळी दिला दहा भ्रुणांना जन्म!

मध्यप्रदेशातल्या रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक गोष्ट घडलीय. इथल्या संजय गांधी मेमोरियल हॉस्पीटलमध्ये २८ वर्षीय अंजू कुशवाहा या महिलेनं एकाच वेळेस दहा मुलांना जन्म दिला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 17, 2013, 09:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
मध्यप्रदेशातल्या रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक गोष्ट घडलीय. इथल्या संजय गांधी मेमोरियल हॉस्पीटलमध्ये २८ वर्षीय अंजू कुशवाहा या महिलेनं एकाच वेळेस दहा मुलांना जन्म दिला.
सतना जिल्ह्यातील कोटी गावात राहणाऱ्या अंजूनं रस्त्यातच नऊ तर हॉस्पीटलमध्ये एका भ्रुणांला जन्म दिला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार भारतीय मेडिकल इतिहासातील हा एक रेकॉर्ड आहे.
हॉस्पीटलच्या असिस्टंट सुप्रिटेंडट डॉक्टर एस. के. पाठक यांया म्हणण्यानुसार रविवारी रात्री या महिलेला हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. हॉस्पीटलमध्ये पोहचण्यापूर्वी रस्त्यातच या महिलेनं नऊ भ्रुणांना जन्म दिला होता. या नऊ भ्रुणांना तिच्या पतीनं – संजयनं - एका कपड्यात लपेटून आणलं होतं. हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यानंतर तिनं दहावाया भ्रुणाला जन्म दिला. हे सगळे भ्रुण १२ आठवड्यांचे होते. यामधील कोणत्याही भ्रुणाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना शक्य झालं नाही.
डॉक्टरांनी या घटनेवर रिसर्च पेपर तयार करायला सुरुवात केलीय. स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर सुमित्रा यादव यांच्या म्हणण्यानुसार, ‘इन व्रिटो फर्टिलिटी’ (आयव्हीएफ) प्रक्रियेनंतर वेळोवेळी तपासणी न झाल्यानं अशा पद्धतीच्या घटना घडतात. अशावेळी ‘सिलेक्टिव्ह टर्मिनेशन’ पद्धतीचा प्रयोग करून कमीत कमी तीन भ्रुणांचा जीव वाचवला जाऊ शकतो. परंतु, अशा केसेसमध्ये गर्भपात किंवा आयुष्यभर अपंगत्वाची शक्यता असते.
याआधी केलेल्या रिसर्चनुसार, १९७१ मध्ये रोममधल्या एका डॉक्टरनं एका महिलेच्या गर्भातून १५ भ्रुणांना काढण्याचा दावा केला होता. तर १९९९ मध्ये मलेशियाच्या एका महिलेनं नऊ मुलांना जन्म दिला होता. परंतु, या केसमध्येही या भ्रुणांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.