कोणत्याही परिस्थितीत रामसेतु तोडणार नाही – केंद्र सरकार

 केंद्र सरकारनं सुप्रिम कोर्टात विचाराधिन असलेल्या ‘सेतु समुद्रम’च्या मुद्द्यावर आज जोरदार मत मांडलंय. कोणत्याही परिस्थितीत राम सेतु तोडला जाणार नाही, असं रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत स्पष्ट केलंय. 

PTI | Updated: Aug 14, 2014, 05:03 PM IST
कोणत्याही परिस्थितीत रामसेतु तोडणार नाही – केंद्र सरकार title=

नवी दिल्ली:  केंद्र सरकारनं सुप्रिम कोर्टात विचाराधिन असलेल्या ‘सेतु समुद्रम’च्या मुद्द्यावर आज जोरदार मत मांडलंय. कोणत्याही परिस्थितीत राम सेतु तोडला जाणार नाही, असं रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत स्पष्ट केलंय. 

राम सेतुला वाचवून देशाच्या हितासाठी विशेष उपयोग केला जाऊ शकतो, असं गडकरी म्हणाले. लोकसभेतील प्रश्नकाळात नितीन गडकरी बोलत होते. मुद्दा कोर्टात असल्यामुळं या विषयावर जास्त बोलणार नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयालात या मुद्द्यावर आम्ही असा सल्ला देऊ की जो सर्व पक्षांना मान्य असेल, असंही गडकरी म्हणाले. 

याबाबतीत तामिळनाडूचा दौरा ते करणार आहेत. केंद्र सरकारची प्रस्तावित सेतुसमुद्रम शिपिंग कालवा प्रकल्प योजना आहे. यात मोठ्या जहाजांना परिवहन योग्य बनवणं आणि सोबतच किनारपट्टीवर मत्स्य आणि शिपिंग पोर्ट स्थापन करणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.