प्रेमाच्या त्रिकोणामुळं गेला सुनंदा पुष्करचा जीव?

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर शशी थरूर आणि सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यात जे वाकयुद्ध सुरू आहे त्याचा सोर्स एक सिनेमा आहे. हा सिनेमा झी मीडियानंच तुम्हाला सर्वप्रथम दाखवला होता. 

Updated: Jan 13, 2015, 10:27 PM IST
 प्रेमाच्या त्रिकोणामुळं गेला सुनंदा पुष्करचा जीव? title=

नवी दिल्ली: सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर शशी थरूर आणि सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यात जे वाकयुद्ध सुरू आहे त्याचा सोर्स एक सिनेमा आहे. हा सिनेमा झी मीडियानंच तुम्हाला सर्वप्रथम दाखवला होता. हा सिनेमा लव्ह ट्रँगलवर आधारीत आहे. यासंबंधी ज्येष्ठ पत्रकार नलिनी सिंहनं आधीच गौप्यस्फोट केला होता. आज आम्ही त्याचा पुरावा दिलाय. 

आधी हा जबाब वाचा -

तिनं मला सांगितलं की मिस्टर थरूर आणि मिस तरारनं दुबईत ३ दिवस आणि ३ रात्री एकत्र घालवल्या. सुनंदानं सांगितलं की दुबईत त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्याकडूनच या अफेअरची माहिती आम्हाला मिळाली. त्यांच्याकडे या गुप्त भेटींचे पुरावे होते.

पत्रकार नलिनी सिंह यांनी विशेष न्यायदंडाधिकारी अशोक शर्मा यांच्यासमोर दिलेल्या साक्षीचा हा एक भाग.

दुबईत शशी थरूर आणि मेहेर तरार जून २०१३ मध्ये तीन दिवस आणि तीन रात्री एकत्र होते. अशी साक्ष नलिनी सिंह यांनी न्यायदंडाधिकारी अशोक शर्मा यांच्यासमोर दिलीय. हा फोटो त्याच काळातला आहे जून २०१३चा.
फोटोत शशी आणि मेहेर जसे एकत्र दिसत आहेत त्यावरून असं दिसतं की त्यांच्यात जवळीक होती. म्हणजेच नलिनी सिंह यांनी केलेला दावा खरा होता.

त्यामुळे शशी थरूर यांचं हे अफेअरच सुनंदा यांच्या मृत्यूचं कारण आहे का असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. 

नलिनी शर्मा यांनी दिलेली दुसरी साक्षही महत्त्वाची आहे. 

१६-१७ जानेवारीला रात्री १२ वाजून १० मिनिटांनी सुनंदानं मला कॉल केला. ती खूप गंभीर होती... चिडली होती.. तिनं मला सांगितलं की मेहेर तरार आणि शशी थरूर एकमेकांना रोमँटीक मेसेज पाठवतात. निवडणुकीनंतर शशी मला घटस्फोट देतील आणि मेहेरसोबत लग्न करतील. तरारनं एका मेसेजमध्ये म्हटलंय की ती शशी थरूर यांच्याशिवाय राहू शकत नाही

म्हणजेच सुनंदा यांना शशी घटस्फोट देतील ही वाटत असलेली भिती खरी होती का?

सुनंदा आपल्या वैवाहिक जीवनाबाबत किती काळजीत होती याचं उदाहरण त्यांच्या ट्वीटरवरूनही दिसून येतं. सुनंदा पुष्कर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये वारंवार मेहेर तरार यांचाही उल्लेख केलाय. 

जेव्हा तुमचा नवरा सोडतो.. तेव्हा दुसऱ्याचा मियां पकडा... अशा महिलेची मला कीव येते..

असाच हा दुसरं ट्वीट पाहा...

मी आणि माझे पती शशी थरूर एकमेकांशी अतिशय सुखात आहोत. मेहेरनं काहीही सांगितलं तरी मला कोणतीही काळजी नाही. टीव्हीवर ती बोलत असलेल्या खोटारडेपणानं मला हसू येतं...

सुनंदाच्या या दोन ट्वीटनं दोन गोष्टी सिद्ध होतात.. एक म्हणजे ती शशी थरूर आणि मेहेर तरार यांच्यातल्या मैत्रीनं काळजीत होती.. आणि दुसरं म्हणजे निवडणुकीनंतर तिला घटस्फोटाची काळजी होती. मात्र निवडणूक निकालांआधीच सुनंदा यांचा मृत्यू झाला. मात्र ज्या प्रकारे तिचा मृत्यू झाला ते पाहता या प्रकरणात संशय निर्माण होतो.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.