भारत-ऑस्ट्रेलियात वनडे मालिका, संघ जाहीर

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, September 19, 2013 - 15:36

www.24taas.com, झी मीडिया, सिडनी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यात वनडे मालिका होत आहे. या मालिकेत सात वनडे तर एक ट्वेंटी-२० सामना होणार आहेत. यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.
भारताविरुद्ध पुढील महिन्यात क्रिकेट रंगत क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. भारतीय संघात कोणाची निवड होणार याकडे लक्ष आहे. मात्र, त्याआधी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची निवड केली आहे. भारत दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातून यष्टीरक्षक मॅथ्यू वेडऐवजी ब्रॅड हॅडीनला संधी देण्यात आली आहे. तर झेव्हियर डोहार्टी आणि मोझेस हेन्रिकेस यांचीही निवड करण्यात आली आहे. डोहार्टीला फवाद अहमदच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाची स्कॉटलंड आणि इंग्लंडविरुद्धची कामगिरी चांगली झाली आहे. हीच विजयाची लय कायम ठेवण्याचा आम्ही भारत दौऱ्यावर प्रयत्न करणार आहोत, असे निवड समितीचे सदस्य जॉन इनवेरिटी यांनी सांगितले. स्टीव्ह रिक्सन हे या संघाचे प्रशिक्षक असणार आहेत.
निवड झालेला संघ
मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली, नॅथन कॉल्टर-नाईल, झेव्हियर डोहार्टी, जेम्स फॉल्कनर, अॅरॉन फिन्च, ब्रॅड हॅडीन, मोझेस हेन्रिकेस, फिल ह्युजेस, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, क्लिंट मॅके, ऍडम व्होजेस, शेन वॉटसन.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 19, 2013 - 15:36
comments powered by Disqus