Zeenews logo
English   
Monday, May 20, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

भाजप विरुद्ध भाजप

Wednesday, September 19, 2012, 22:43
Comments 0
 
भाजप विरुद्ध भाजपwww.24taas.com, पुणे

उद्याच्या भारत बंदमध्ये पुण्यात भाजप सहभागी होणार नाही.. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय.. डिझेल दरवाढ आणि एफडीआयविरोधात एनडीएनं भारत बंदची हाक दिलीय.. मात्र पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये भाजप सहभागी होणार नसल्याचं शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी सांगितलंय.. तसंच पुण्यातल्या नागरिकांनी ऐच्छिक बंद पाळावा असं त्यांनी म्हटलंय

एफडीआय आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी उद्या भारत बंदची हाक दिलीये. या बंदमध्ये युपीएचे काही घटकपक्षही सहभागी होणार असल्यामुळे विरोधकांना हुरूप आलाय.केंद्र सरकारनं घेतलेले दोन महत्त्वाचे निर्णय विरोधकांसह काँग्रेसच्या काही मित्रपक्षांनाही पसंत पडलेले नाहीत... गुरूवारी होणा-या भारत बंदमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आणि करूणानिधींचा डीएमके हे पक्ष सहभागी होणार आहेत... यामुळे हा भारत बंद अधिक यशस्वी होईल असं विरोधक मानतायत...

एकीकडे सरकारमधलेच काही पक्ष भारत बंदमध्ये असताना एनडीएमधली शिवसेना मात्र या बंदमध्ये सक्रीय असणार नाही. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम असल्यामुळे या भारत बंदला केवळ तात्विक पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय.
शिवसेना, मनसेचा या बंदला सक्रीय पाठिंबा नाही. त्यातच दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जनही गुरूवारी होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये बंदला कसा प्रतिसाद मिळतो, याबाबत शंका उपस्थित केली जातेय.

गुरूवारच्या भारत बंदला एनडीएमधले भाजपा, संयुक्त जनता दल, सेक्युलर जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, बीजू जनता दल, तेलगू देसम, आरएसपी आहेत, तर काँग्रेसचे मित्रपक्ष डीएमके, समाजवादी पार्टी यांचा पाठिंबा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, तृणमूल काँग्रेस हे सत्ताधारी पक्ष बंदमध्ये सहभागी होणार नाहीत...
जनहिताविरोधात घेतलेल्या या निर्णयांचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेला हा बंद यशस्वी होईल, असा विरोधकांचा दावा आहे.

First Published: Wednesday, September 19, 2012, 20:54

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: