डिझेल, गॅस भडकले, करा संताप व्यक्त

डिझेल पाच रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून या नव्या दराने डिझेल विकत घ्यावे लागेल. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात सध्या वाढ झालेली नाही. पण आता वर्षभरात एका ग्राहकाला सबसिडी असलेले फक्त सहा सिलिंडर मिळणार आहेत. त्यानंतर सातव्या सिलिंडरची गरज लागली, तर तो बाजारभावानुसार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत सातशेच्या वर जाणार आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 13, 2012, 09:57 PM IST

www.24taas.com, मुंबई
डिझेल पाच रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून या नव्या दराने डिझेल विकत घ्यावे लागेल. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात सध्या वाढ झालेली नाही. पण आता वर्षभरात एका ग्राहकाला सबसिडी असलेले फक्त सहा सिलिंडर मिळणार आहेत. त्यानंतर सातव्या सिलिंडरची गरज लागली, तर तो बाजारभावानुसार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत सातशेच्या वर जाणार आहे. यावर वॅट कर वेगळा आकारला जाणार आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरची किंमत साडे सातशे ते आठशे पर्यंत जाणार आहे.
केंद्र सरकारने सामान्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम केले आहे. तुम्हांला काय वाटते. द्या तुमची प्रतिक्रिया खालील प्रतिक्रियांचा बॉक्समध्ये