चिनी सैनिक घालतायेत घिरट्या....

चीनच्या हेलिकॉप्टर्सनी भारतीय सीमेमध्ये केवळ घुसखोरीच केली नाही तर त्यांनी भारतीय सुरक्षा दलाद्वारे तयार करण्यात आलेल्या बंकर्सची छायाचित्रंही काढलीयत.

Updated: Apr 30, 2013, 02:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लडाख
चीनच्या हेलिकॉप्टर्सनी भारतीय सीमेमध्ये केवळ घुसखोरीच केली नाही तर त्यांनी भारतीय सुरक्षा दलाद्वारे तयार करण्यात आलेल्या बंकर्सची छायाचित्रंही काढलीयत. चीन या छायाचित्रांचा भारतावर आरोप लावण्यासाठी उपयोग करण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांचं म्हणणय.
चीनच्या हेलिकॉप्टर्सनी लद्दाखच्या चुमूर परिसरात 21 एप्रिलला आठवड्यात दुस-यांदा भारतीय सीमा ओलांडली. मात्र यावेळी त्यांनी परिसरात केवळ घिरट्या न घालताच लष्करी बंकरचे फोटो देखील काढलेत. भारतीय सुरक्षा दलानं ही बंकर्स नुकतीच तयार केलीयत. सध्या चीन भारताला सीमेवर तणाव निर्माण करण्यास जबाबदार ठरवून आपल्या घुसखोरीचं उत्तर देऊ इच्छितंय.

दिल्लीत चीनच्या घुसखोरीबाबत माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यांनी चीनला क्रमांक एकचा शत्रू म्हटलंय. तसंच चीनसोबत राजनैतिक संबंधांवर तीव्र सवालही उपस्थित केलेत. सरकार चीनसोबतचा तणाव संपविण्यासाठी राजनैतिक पर्यायांवरच विश्वास ठेवतंय.
मे महिन्यामध्ये दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणारेय. तर दौलत बेग ओल्डीमध्ये परिस्थिती जैसे थेच आहे. चिनी सैनिकांच्या तंबूसमोरच थांबलेले सैनिक दिवसात अनेक वेळा बॅनर्सच्या माध्यमातून चिनी सैनिकांना परिसर रिकामा करण्यासाठी सांगतायत. मात्र चिनी सैनिकांकडून कुठलीही प्रतिक्रिया येताना दिसत नाही.