पाकची अमेरिकेला ताकीद

पाकिस्तानने आता आपला हक्क गाजवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. कारण की पाकिस्तानने शम्सी एअरबेस सोडण्याची अमेरिकेला ताकीद दिली आहे.

Updated: Nov 27, 2011, 04:48 PM IST
झी 24 तास वेब टीम, इस्लामाबाद

 

पाकिस्ताने आता  हक्क गाजवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. कारण की पाकिस्तानने शम्सी एअरबेस सोडण्याची अमेरिकेला ताकीद दिली आहे.  नाटोच्या सैन्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानने अमेरिकेला १५ दिवसांत शम्सी एअरबेस सोडण्याची ताकीद दिली आहे.

 

ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये ठार मारण्यात आल्यापासून पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोच्या सैनिकांनी शुक्रवारी रात्री पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला करीत २८ जवानांना ठार मारले. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आणखीच वितुष्ठ निर्माण झाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अमेरिकेने शम्सी एअरबेस १५ दिवसांत सोडावा, असा निर्णय घेतला आहे.
शम्सी एअरबेस हा वायव्य पाकिस्तानमध्ये आहे. अमेरिकेची सीआयए संस्था ड्रोन हल्ल्यांसाठी याच एअरबेसचा वापर करते. तसेच नाटोच्या सैनिकांच्या हेलिकॉप्टर्सने याच एअरबेसवरून उड्डाण घेत पाकच्या जवानांवर हल्ला केला होता. पाकिस्तानने या एअरबेससह अमेरिकी सैन्याला होत असलेली मदतही थांबविली आहे.