आता अंडरपँट बाँम्बचा धोका...

Last Updated: Thursday, May 10, 2012 - 18:16

www.24taas.com, लंडन

 

 

ब्रिटनमधून अमेरिकेत जाणाऱ्या विमानांमध्ये अत्याधुनिक अंडरपँट बॉम्बद्वारे आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेच्या एअर मार्शलने व्यक्त केली आहे. मध्य आशियात हा अंडरपँड बॉम्ब तयार करण्यात आला आहे.

 

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन यांच्या खात्माला १ वर्ष पूर्ण झाले या पार्श्वभूमीमुळे अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांनी एक अंडर कव्हर एजंट युरोपमध्ये गेल्या आठवड्यात पाठविला होता. हा अधिकारी अलकायदाचाही एजंट म्हणून काम करीत होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार अल-कायदाने हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेला बॉम्ब यमेनमधून स्मगल केला आहे. हा बॉम्ब मेटल डिटेक्टरमध्ये सापडू शकत नाही, तसेच तो अंडरवेअरमध्ये सहज बाळगता येतो.

 

येमेनमध्ये अल-कायदाच्या मास्टरमाइंटने हा बॉम्ब तयार केला होता. तो या एजंटने सुरक्षित येमेनच्या बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. हा बॉम्ब नंतर साउदी अरेबियाला पाठविण्यात आला.

 

यापूर्वी २०११मध्ये अमेरिकन विमानात स्फोट घडविण्यासाठी नायजेरियाचा आत्मघाती ओमर अब्दुलमुत्तलब याने अंडरपँट बॉम्बचा वापर केला होता. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे त्याला स्फोट घडविता आला नाही आणि तो अमेरिकेच्या हाती लागला. 

First Published: Thursday, May 10, 2012 - 18:16
comments powered by Disqus