उ. कोरियाने अण्वस्त्रे नष्ट करावीत - चीन

Last Updated: Thursday, April 19, 2012 - 12:26

www.24taas.com, बीजिंग

 

 

उत्तर कोरियाने आपली ताकद दाखविण्यासाठी रॉकेट प्रक्षेपण केरण्याचा प्रयत्न केला. मात्र , याची गंभीर दखल चीनने घेतली आहे. उत्तर कोरियाने आपल्याकडील अण्वस्त्रे नष्ट करावीत, असा सल्ला चीनने दिला आहे. त्यामुळे चीन आणि उ. कोरिया यांच्यातील संबंध  बिघडण्यास होण्याची शक्यता आहे. चीनचा सल्ला उ. कोरिया किती मनावर घेईल, याबाबत शंका आहे.

 

 

उत्तर कोरियाने नुकतीच क्षेपणास्त्र चाचणी घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो अयशस्वी झाला होता. या चाचणीमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. ही भीती व्यक्त या निमित्ताने खरी ठरल्याचे इशाऱ्यावरून दिसून येत आहे.  चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिऊ वेइमन  म्हटले आहे,  दोन्ही देशांनी शांततेने आणि चर्चेच्या मार्गाने सर्व समस्यांवर तोडगा काढला पाहिजे. आपला आण्विक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगालाही पाहाणीसाठी बंदी घातली होती.

 

 

संबंधित बातमी

 

उ.कोरियाचे रॉकेट प्रक्षेपण फसले

उत्तर कोरियाने आपली ताकद दाखविण्यासाठी रॉकेट प्रक्षेपण केले खरे मात्र, काही कालावधीच ते कोसळले. या रॉकेटचे अवशेष समुद्रात सापडले आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाची मोहीम फसली आहे. हे रॉकेट कोसळ्याची माहीती उ. कोरियाच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


First Published: Thursday, April 19, 2012 - 12:26


comments powered by Disqus