एड्सवर परिणामकारक लस लवकरच

Last Updated: Sunday, January 8, 2012 - 12:41

www.24taas.com, मुंबई 

 

एडस रोगाच्या विरोधातली दीर्घकाळ चाललेली लढाई अखेर मानव जिंकेल अशी आशा निर्माण झाली आहे. सिमियन इम्युनोडेफिशीन्सी व्हारयस म्हणजेच एस आय व्ही या एडसच्या सर्वात घातक प्रकारवरच्या लशीचा माकडावरचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता या लसीचा प्रयोग माणसावर करण्यात येणार आहे. द डेली या ऑनलाईन वर्तमानपत्राने या संबंधीचे वृत्त दिलं आहे. लसीमुळे एसआयव्ही या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता तब्बल ८० टक्क्यांनी कमी झाली. एडसशी लढण्याची प्रतिकारशक्ती या लसीमुळे निर्माण होते. माकडावरचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता माणसाला त्याचा लाभ निश्चित होईल असं शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे.

 

जॉनसन अँड जॉनसन या बहुराष्ट्रीय औषध निर्मिती क्षेत्रातील बलाढ्य कंपनीचा लस विभाग या लसीची निर्मिती करण्यात शक्यता आहे. थायलंडमध्ये २००९ साली दोन वेगवेगळ्या लसी टोचण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता, त्यामुळे एडसचं प्रमाण ३१ टक्क्यांनी कमी झालं होतं. त्यापासून प्रेरणा घेऊन हा प्रयोग करण्यात आल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

 

 First Published: Sunday, January 8, 2012 - 12:41


comments powered by Disqus