ओबामाही ठरले 'अंडरअचिव्हर'

Last Updated: Saturday, July 21, 2012 - 17:06

www.24taas.com, मुंबई

 

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील टाईम मॅगझिननं भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ‘दी अंडरअचिव्हर’ म्हणून संबोधलं होतं. पण, आता भारतातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘आऊटलूक’ या इंग्रजी मॅगझिननं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना ‘द अंडरअचिव्हर’ ही पदवी बहाल केलीय.

 

'अमेरिका निडेड ए रिबूट' म्हणजेच अमेरिकेला एका नव्या सुरूवातीची गरज आहे असं म्हणत ‘आऊटलूक’नं ओबामांवर टीका केलीय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईम मॅगझीननं मनमोहन सिंग यांचा फोटो कव्हरपेजवर छापून त्याखाली ‘द अंडरअचिव्हर’ हे शीर्षक दिलं होतं तर आता आऊटलूकनं बराक ओबामा यांचा फोटो कव्हरपेजवर छापून त्याखाली ‘द अंडरअचिव्हर’ हे शीर्षक दिलंय. पण, अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकांच्य पार्श्वभूमीवर आपण हा अंक बराक ओबामा यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यासाठी प्लान केला होता. त्याआधीच टाईमनं पंतप्रधानांवर टीका करणारा अंक प्रसिद्ध केला हा केवळ योगायोग आहे, असं स्पष्टीकरण आऊटलूकचे संपादक कृष्ण प्रसाद यांनी दिलंय.

 

आऊटलूकनं ओबामांवर केलेल्या टीकेमुळे सोशल वेबसाईटवर मात्र बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया पाहायला मिळतायत.

 

.

 

 

First Published: Saturday, July 21, 2012 - 17:06
comments powered by Disqus