ओसामाच्या पाकमधील घराचे मॉडेल सार्वजनिक

Last Updated: Friday, May 18, 2012 - 16:12

www.24taas.com, वॉशिंग्टन

कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन यांच्या पाकिस्तानातील घरावर हल्ला करण्यासाठी अमेरिकन नौदलाने ज्या छोट्या प्रकृतीचा वापर केला होता. ते मॉडेल आज सार्वजनिक करण्यात आले आहे.

 

अमेरिकन लष्काराचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉन येथील एका विशिष्ट ठिकाणी या मॉडेलला ठेवण्यात आले आहे. एक इंच उंच आणि एकूण सात फूट लांब अशी ही प्रतिकृती हुबेहुब ओसामाच्या ऐबटाबाद येथील घरासारखी आणि एकूण परिसरासारखी दिसते. गेल्यावर्षी अमेरिकन नौदलाने कारवाई करून ओसामा बिन लादेन याला ऐबटाबाद येथील घरात कंठस्नान घातले होते.

First Published: Friday, May 18, 2012 - 16:12
comments powered by Disqus