कतारमध्ये आगीत १९ ठार

Last Updated: Tuesday, May 29, 2012 - 11:03

www.24taas.com, दोहा

 

कतारची राजधानी दोहा शहरातील एका मॉलला लागलेल्या भीषण आगीत १९ जण ठार झाले आहेत. यामध्ये  १७ जण जखमी आहेत.

 

या आगीत मृत झालेल्यांमध्ये १३ मुलांसह चार शिक्षक आणि दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. जखमींमध्ये चार मुले आहेत. मृत मुलांमध्ये स्पेनमधील चार मुलांचा समावेश आहे. मॉलमधील आगीचे व्हिडिओ ऑनलाईन प्रसिद्ध झाला असून, यामध्ये धुराचे लोट येताना दिसत आहेत, अशी माहिती कतारच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिली.

 

दोहा शहरात हा मॉल प्रसिद्ध होता. त्यामुळे त्या ठिकाणी नेहमी गर्दी होत असते. ही आग कशामुळे लागली आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. मॉलला आग  लागल्यानंतर धुराचे काळे लोट परिसरात दिसून येत होते.

First Published: Tuesday, May 29, 2012 - 11:03
comments powered by Disqus