चीनी उद्योजकांना भारताचा दरवाजा बंद

Last Updated: Thursday, February 9, 2012 - 17:11

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

चीनच्या उद्योजकांना भारताने परवानगी नाकारली आहे. हा चीनसाठी एक इशारा असल्याचे समजला जात आहे. याआधी चीनमध्ये भारतीय व्यापाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यावेळी चीनने काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही झटका दिल्याचे बोलले जात आहे.

 

 

चीनचे उद्योजक गुजरात भेटीसाठी इच्छुक होते. मात्र भारताला आलेल्या अनुभवावरून चीनच्या उद्योजकांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून हे शिष्टमंडळ येत्या मार्चमध्ये गुजरात भेटीवर येण्याच्या तयारीत होते. मात्र, आता भारत भेटीची परवानगी नसल्याने हा मोदींना झटका समजला जात आहे.

 

 

मुंबईस्थित उद्योजक श्‍यामसुंदर अग्रवाल आणि दीपक रहेजा यांना नुकतीच चीनमध्ये अटक करण्यात आली होती. व्यापारातील बिले अदा करण्याच्या वादातून ही कारवाई झाली होती. त्यांना चीन सोडण्यासही मनाई करण्यात आली होती. भारताच्या विनंतीनंतरही चिनी प्रशासनाने या प्रकरणात प्रतिकूल भूमिका घेतली होती. त्यामुळेच चीनच्या शिष्टमंडळाला परवानगी नाकारत असल्याचे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कळविण्यात आलं आहे.

First Published: Thursday, February 9, 2012 - 17:11
comments powered by Disqus