नातेसंबंध झाले क्षीण, घटस्फोटांना घाबरलं चीन!

Last Updated: Thursday, July 26, 2012 - 21:24

www.24taas.com, बीजिंग

 

अनेक जोडपी लग्नानंतर काही काळात घटस्फोटाशी येऊन पोहोचतात. परंतु या घटस्फोटाचे प्रमाण दिवसें-दिवस वाढताना दिसत आहे. मात्र जागतिक पातळीवर या घटस्फोट कायद्याला सुलभ बनवणारं चीन आता मात्र आपली भूमिका बदलू लागला आहे.

 

सर्वाधिक लोकसंख्या आसणाऱ्या चीनमध्ये दर अर्ध्या तासाला एक असं घटस्फोटाचे प्रमाण आहे. हे वाढतं प्रमाण पाहून घटस्फोटाबद्दलचे आपले विचार बदला असं अवाहन शासनाकडून विवाहितांना केलं जात आहे.

 

चीनमधील झिजियांग प्रांतामध्ये प्रायोगिक पातळीवर एक कायदा करण्यात आला होता. त्यानुसार नवीन घटस्फोट कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्यानुसार घटस्फोट घेणाऱ्या जोडप्य़ांना घटस्फोटाच्या परिणामांचा विचार करण्यासाठी काही वेळ दिला जातो. या वेळेत शांतपणे विचार करुन नंतर निर्णय घ्यावा, अशी तरतुद करण्यात आली आहे. सामाजिक कल्याण विभागातील निंगबो नागरीक समस्या ब्युरोच्या माहितीनुसार या कायद्यानुसार आतापर्यंत ३३६ दापत्यांना घटस्फोटापासून वाचवण्यात यश आले आहे.

First Published: Thursday, July 26, 2012 - 21:24
comments powered by Disqus