परदेशी नोकरीचे स्वप्न आता महाग

तुम्ही परदेशी जाण्याचा बेत आखत असाल किंवा परदेशी नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलातर ते स्वप्न आता महाग झाले आहे. त्याचे कारणही तसचं आहे, अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच १बी व्हिसासाठी आकारण्यात येणाऱ्या फीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

Updated: Mar 29, 2012, 10:53 AM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन 

 

तुम्ही परदेशी जाण्याचा बेत आखत असाल किंवा परदेशी नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलातर ते स्वप्न आता महाग झाले आहे. त्याचे कारणही तसचं आहे,  अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच १बी व्हिसासाठी आकारण्यात येणाऱ्या फीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

 

 

वाढवण्यात आलेल्या भरमसाठ फीचा सर्वाधिक फटका अमेरिकेत आऊसोर्सिंग करणाऱ्या आणि तंत्रज्ञ पुरवणाऱ्या भारतीय आयटी कंपन्यांना बसणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय आयटी व सेवाक्षेत्रातील कंपन्यांना बसणार आहे. या कंपन्यांच्या उत्पन्नातील ६० टक्के वाटा अमेरिकेतून येणाऱ्या उत्पन्नाचा असतो.  त्यामुळे त्यांना या निर्णयाची मोठी झळ सोसावी लागू शकते.

 

 

१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या आथिर्क वर्षासाठी एच १बी व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया २ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे 'यूएससीआयएस'ने बुधवारी जाहीर केले. या विभागापर्यंत पोहोचलेल्या व्यवस्थित भरलेल्या आणि कोर्ट फी जोडलेल्या अर्जांचाच एच १बी व्हिसासाठी विचार केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 
अमेरिकेतील कर्मचाऱ्यांची भरती करण्याऐवजी भारतीय किंवा अन्य देशांतील कर्मचाऱ्यांना घेण्याच्या अमेरिकन कंपन्यांच्या पद्धतीला चाप लावण्यासाठी एच १बी व्हिसाच्या फीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, ५० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीत ५० टक्क्यांपेक्ष अधिक कर्मचारी परदेशी असतील तर, त्यांच्या एच १बी व्हिसासाठी किमान ३२५ डॉलर ते जास्तीत जास्त २००० डॉलर भरावे लागतील. याची अमलबजावणी येत्या आथिर्क वर्षात होणार आहे.

 

 

व्हिसाप्रक्रियेची जबाबदारी असलेल्या 'यूएससीआयएस' या विभागामार्फत यावषीर् २५ पेक्षा कमी परदेशी कर्मचारी असलेल्या कंपन्यांतील एच १बी व्हिसासाठी ७५० डॉलर आकारण्यात येत होते. तर २६ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसाठी १५०० डॉलर आकारण्यात येत होते.  याशिवाय, फसवणूक प्रतिबंधक व तपास शुल्कापोटी ५०० डॉलर घेण्यात येणार आहेत. तसेच १५ दिवसांच्या आत व्हिसा आवश्यक असल्यास आणखी १२२५ डॉलर वसूल केले जाणार आहेत.