बगदाद बॉम्बस्फोटात १६ ठार

Last Updated: Friday, June 1, 2012 - 15:24

www.24taas.com, बगदाद

 

बगदादमध्ये गुरुवारी साखळी बाँम्बस्फोटांत सुमारे १६ जण ठार झाले, तर ५६ लोक जखमी झाले.

 

बगदादच्या उत्तर, दक्षिण आणि पश्‍चिम भागात रस्त्याच्या बाजूला, तसेच स्फोटके ठेवलेल्या कारचे स्फोट घडवून आणण्यात आले. स्फोटांमुळे  बगदाद शहरात सर्वत्र रक्ताचा सडा पसला होता.

 

उत्तर बगदादमध्ये एका कारमध्येबॉम्बस्फोट  झाला. त्यामध्येच १३ ठार झालेत. तर ३२ जण जखमी झाले. ही कार आत्मघाती हल्लेखोर चालवीत होता, असे पोलिसांनी सांगितले.

First Published: Friday, June 1, 2012 - 15:24
comments powered by Disqus