बराक ओबामांची आई गुलाम?

गुलामगिरीत राहणं कोणालाच आवडतं नसतं, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची आई आणि त्यांचे पूर्वज हे स्वत: गुलाम असल्याचे समोर आले आहे.

Updated: Aug 1, 2012, 12:25 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

 

गुलामगिरीत राहणं कोणालाच आवडतं नसतं, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची आई आणि त्यांचे पूर्वज हे स्वत: गुलाम असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची आई देशातील पहिल्या कृष्णवर्णीय गुलामाची वंशज असल्याचा दावा एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे.

 

ओबामा यांच्या आईचे पूर्वज जॉन पंच हे चार शतकांपूर्वी व्हर्जिनियाच्या गुलामांच्या वसाहतीमध्ये राहत होते. ते देशातील पहिल्या कृष्णवर्णीय गुलामांच्या पिढीतील पहिले गुलाम आहेत. ओबामा हे पंच यांचे अकरावे वंशज आहेत.

 

ओबामा यांची आई स्टॅनली अ‍ॅन डनहॅम या युरोपियन वंशाच्या आहेत; परंतु त्यांच्याविषयीच्या संशोधनात नवी तथ्ये सापडली आहेत. मात्र, स्टॅनली यांचे अमेरिका व आफ्रिकन पूर्वज होते, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे. या संशोधनामुळे ओबामा यांच्या अमेरिकन आत्मचरित्रावर प्रकाश पडणार आहे.