बलुचिस्तानात हिंदू व्यापाऱ्यांचं अपहरण

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी तीन हिंदू व्यापा-यांचे अपहरण करण्यात आलं आहे. सीमेपारच्या भागात हिंदू अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Updated: Jul 31, 2012, 05:26 PM IST

www.24taas.com,क्वेट्टा

 

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी तीन हिंदू व्यापा-यांचे अपहरण करण्यात आलं आहे. सीमेपारच्या भागात हिंदू अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. बलुचिस्तानाची राजधानी असलेल्या क्वेट्टा शहरापासून १४० किलोमीटरवर असलेल्या एका ठिकाणावरून दिनेश कुमार , रितेश कुमार आणि रतन कुमार या एकाच कुटुंबातील भारतीय व्यापा-यांचे शुक्रवारी रात्री अपहरण करण्यात आले. एका कौटुंबिक कार्यक्रमावरून घरी परतत असताना या व्यापार्यांचे अपहरण करण्यात आले.

 

सरकार या प्रांतातील हिंदूंचे रक्षण करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. येथील हिंदूंनी सरकारच्या विरोधात निदर्शनं केली. हिंदू नागरिकांचे प्रतिनिधी असलेल्या मंडळाने केलेल्या या निदर्शनांना राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनांनी प्रतिसाद दिला. कलत जिल्ह्यातील आरसीडी हायवेवर जीवा येथे दोन कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांची व्हॅन अडवली. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आलं.

 

त्यांच्या नातेवाइकांपर्यंत अद्याप कोणी पोहोचलेले नाही. त्यामुळे हे अपहरण खंडणीसाठी केलं असावं अशी शक्यता बलुचिस्तानचे अधिकारी अब्दुल रहीम यांनी वर्तविली. अपहरणानंतर कलात भागामध्ये शनिवारी व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला.