'बीबीसी' चॅनेल अखेर विकलेच....

Last Updated: Wednesday, July 18, 2012 - 09:24

www.24taas.com, लंडन

 

'बीबीसी' गेली अनेक वर्ष जगभरातील टीव्ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हे चॅनेल अखेर विकले गेले आहे. ग्रेट ब्रिटनच्या जगविख्यात ‘बीबीसी’ आर्थिक अडचणीत आल्याने ५२ वर्षाचे प्रसिध्द टिव्ही सेंटर मालमत्ता विकासक स्टैनहोप याला विकले आहे.

 

बीबीसीने तब्बल २० कोटी पौड (सुमारे १७.२४अब्ज रुपये) किंमतीला या केंद्राची विक्री केली. खर्चात कपात करण्यासाठी बीबीसीने हे पाऊल उचलले आहे. टिव्ही प्रॉडक्शनसाठी २९ जून १९६० रोजी हे केंद्र सुरू केले होते. या केंद्राला २००९ साली ऐतिहासिक स्थळाचा दर्जा देण्यात आला.

 

त्यामुळे या केंद्राच्या इमारतीत कोणतेही बदल अथवा त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. या केंद्राची विक्री करण्यासाठी जून २०११ मध्ये या केंद्राला बीबीसीने सार्वजनिक केले होते. गेल्या आर्थिक वर्षात कर्मचार्‍यांच्या वेतनातही बीबीसीने कपात केली होती.

 

 

 

 

First Published: Wednesday, July 18, 2012 - 09:24
comments powered by Disqus