भारताला चीनची धमकी, तेल काढू नका

चीनने भारताला पुन्हा धमकावले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. दक्षिण चीमधील समुद्रातून तेल भारताने तेल काढले तर भारताला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा चीनमधील एका अधिकाऱ्याने दिला आहे.

Updated: Apr 5, 2012, 06:01 PM IST

www.24taas.com, बीजिंग

चीनने भारताला पुन्हा धमकावले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध  बिघडण्याची शक्यता आहे. दक्षिण चीमधील  समुद्रातून तेल  भारताने  तेल काढले तर भारताला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा चीनमधील एका अधिकाऱ्याने दिला आहे.

चीन सरकारकडून 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ चीन'चे अध्यक्ष वू सिचून यांनी हा इशारा देताना म्हटले आहे की, चीन आपल्या समुद्री क्षेत्रात कोणाचेही सहकार्य घेऊ इच्छित नाही.  दक्षिण चीनमधील समुद्रापासून आपण दूर राहावे. या वादग्रस्त क्षेत्रातून भारताने तेलाचा उपसा केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

दक्षिण चीनमधील समुद्रात भारतीय तेल कंपनी ओएनजीसी आणि व्हिएतनामची तेल कंपनी संयुक्तरीत्या तेलउपसाचा प्रकल्प राबवित आहे. चीनने कंबोडियातील शिखर परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी संघटित राजकारण केले होते. मात्र, त्याला यश आले नव्हते. दक्षिण चीनमधील समुद्रातून तेल काढण्याच्या मुद्यावरून चीनने भारताला  पुन्हा धमकाविले. गेल्या काही दिवसांत चीन भारताला वारंवार धमकावत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.